माण (सातारा) - तालुक्यातील बनगर वाडी येथील एका शेतामध्ये सुमारे पावणे आठ लाख रुपये किमतीच्या गांजाची शेती केल्याचे समोर आले आहे. जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही शेती उद्ध्वस्त केली आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बनगरवाडी तालुका माण येथे शिंगाड्याची शेती नावाचे शिवार आहे. या शिवारात एका व्यक्तीने गांजाची शेती केली आहे, अशी गोपनीय माहिती रात्रीच्या सुमारास पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड पोलिसांनी त्या गांजाच्या शेतीवर छापा टाकली. यावेळी या तिघांचीही विचारपूस केली असता गांजा विक्री करण्यासाठी लावण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली. जिल्ह्यातील मागील काही वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते.