सातारा- मुबंई येथील कुर्ला परिसरातील सोन्या-चांदीच्या दुकानातील चोरीप्रकरणी पाटण तालुक्यातील बिबी येथील 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली. यावेळी पाटण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व कर्मचारी उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी, की कुर्ला परिसरातील विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 नोव्हेंबरला सोन्या-चांदीच्या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहान्याने 1 महिला व 2 पुरुष आले होते. त्यावेळी यातील एका महिलेने येथील दुकान मालकाला वेगवेगळे सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले. हे दाखवत असताना 2 पुरुषांनी काही दागिने लंपास केले. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहुन दुकान मालकास लक्षात येताच त्यांनी 16 नोव्हेंबरला विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
हेही वाचा - आश्रम शाळेत विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचे अनैसर्गिक कृत्य; शिक्षकावर गुन्हा दाखल