सातारा - कोरोना संशयितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी लाॅकडाऊनची अंमलबजावणी काटेकोर करावी, असे प्रशासन आवाहन करत आहे. अशा वेळी पोलिसांचा डोळा चुकवून इव्हिनिंग वाॅक करणाऱ्या 29 नागरिकांशी धरपकड करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
साताऱ्यात 'इव्हिनिंग वाॅक' करणाऱ्या 29 जणांवर गुन्हा - कोरोना न्यूज
कोरोना संशयितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी लाॅकडाऊनची अंमलबजावणी काटेकोर करावी, असे प्रशासन आवाहन करत आहे. अशा वेळी पोलिसांचा डोळा चुकवून इव्हिनिंग वाॅक करणाऱ्या 29 नागरिकांची धरपकड करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
लाॅकडाऊन, जमावबंदी हे शब्द गेल्या 15-20 दिवसांत अंगवळणी पडले असतानाही अद्यापी काही लोक स्वत:च्या जिवावर उदार होऊन घराबाहेर पडायला निमित्त शोधत आहेत. अशांवर गुन्हे दाखल होत असल्याचे प्रसार माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवले जात आहेत. तथापी, काहींना मराठीतून सांगूनही उमजेना. अशा 29 नागरिकांची शहर पोलिसांनी धरपकड करुन कायद्याचा हिसका दाखवला. चारभिंत, अजिंक्यतारा परिसरात इव्हिनिंग वाॅकसाठी गेलेल्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्याबाहेर एका रांगेत सर्वांना उभे करण्यात आले होते. सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.