सातारा- सोशल डिस्टंसिंग आणि जमावबंदीच्या नियमाचे करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका घरात २० जण तर, शिवाजी स्टेडियमजवळ ६ जण एकत्र नमाज पठण करत असताना पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. एकूण २६ जणांवर कारवाई करण्यात आली.
जमावबंदीचे उल्लंघन; एकत्रित नमाज पठण करणाऱ्या 26 जणांना 15 हजारांचा दंड - जमावबंदीचे उल्लंघन
एका घरात २० जण तर, शिवाजी स्टेडियमजवळ ६ जण एकत्र नमाज पठण करत असताना पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. एकूण २६ जणांवर कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी एकत्रित नमाज पठण करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचार आणि जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तरीही गोटे (ता. कराड) येथे २० जण आणि कराडमधील शिवाजी स्टेडियम परिसरात ६ जण एकत्र येऊन नमाज पठण करत होते.
याबाबतची माहिती मिळताच डीवायएसपी सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, हवालदार योगेश भोसले, संजय जाधव, होमगार्ड ए. पी. पुस्तके, तानाजी शिंदे, प्रफुल्ल गाडे, संतोष माळी यांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १५ हजार रूपये दंड ठोठावला.