महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात 26 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या 452 - सातारा कोरोना न्यूज

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 452, उपचार घेत असलेले 302, कोरोनामुक्त 134 आणि मृत्यू 16 झाले आहेत.

corona
कोरोना

By

Published : May 29, 2020, 8:02 AM IST

सातारा - जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 26 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जावळी तालुक्यातील केळघर ( तेटली ) येथील मुंबईवरून आलेल्या आजारी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू 26 मे रोजी झाला होता, मृत्यू पश्चात त्याचे स्त्राव तपासणीसाठी घेतले होते, ते आजच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

या बाधित रुग्णांमध्ये

पाटण तालुक्यातील सळवे येथील 1, सदूवरपेवाडी येथील 1, करपेवाडी येथील 1, गलमेवाडी येथील 1, घनबी येथील 1.

कराड तालुक्यातील म्हासोली येथील 8, वानरवाडी येथील3, भरेवाडी येथील 1.

फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील 1.

वाई तालुक्यातील जांभळी येथील 6

जावळी तालुक्यातील आपटी येथील1 , व केळघर (तेटली )येथील 1 (मृत)

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 452, उपचार घेत असलेले 302, कोरोनामुक्त 134 आणि मृत्यू 16 झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details