महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा कहर : कराडमध्ये एका दिवसात आढळले २४ कोरोना पॉझिटिव्ह - सातारा

वनवासमाची (ता. कराड) येथे आणखी १२ आणि मलकापूर येथील २ जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे.

karad corona
karad corona

By

Published : May 2, 2020, 7:08 AM IST

कराड (सातारा) - कराड तालुक्यासाठी शुक्रवार कोरोना वार ठरला. एकाच दिवसात तब्बल २४ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सायंकाळपर्यंत १० जण कोरोनाबाधित होते. रात्री उशीरा आणखी १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५६ झाली आहे.

वनवासमाची (ता. कराड) येथे आणखी १२ आणि मलकापूर येथील २ जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. यामुळे कराड तालुक्यातील परिस्थिती चिनताजनक बनली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६९ पोहोचला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details