महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाटण तालुक्यातील ढेबेवाडीजवळ २२ लाखांचे लाकूड जप्त - पाटण तालुका

पाटण तालुक्यात बेकायदा वृक्ष तोडप्रकरणी धाडसी कारवाई करत सुमारे २२ लाख रुपये किमतीचे साग व इतर प्रजातींच्या वृक्षाचे लाकूड ताब्यात घेतले आहे.

पाटण

By

Published : Jun 30, 2019, 11:28 PM IST

सातारा- वनविभागाच्या फिरत्या पथकाने पाटण तालुक्यात बेकायदा वृक्ष तोडप्रकरणी धाडसी कारवाई करत सुमारे २२ लाख रुपये किमतीचे साग व इतर प्रजातींच्या वृक्षाचे लाकूड ताब्यात घेतले आहे.

ढेबेवाडी येथील राजाराम बेलागडे याच्यावर बेकायदा वृक्षतोड व बेकायदा लाकडांची वाहतूक केल्याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२) ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर संशयितांचा वनाधिकारी शोध घेत आहेत.

पाटण तालुक्यात साग व इतर झाडांची बेकायदा वृक्षतोड झाल्याची माहिती बातमीदारामार्फत वनाधिकाऱ्यांना मिळाली. फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ढेबेवाडी, मानेगाव, शिंबेवाडी व सणबूर येथे तपासणी करण्यात आली. त्यात ढेबेवाडी येथे १ लाख २२ हजार ३०५, मानेगाव येथे १२ लाख २४ हजार ७७, शिबेवाडी येथे ४ लाख ७० हजार २४८ व सणबूर येथे ३ लाख ४ हजार ९६८ रुपयांचे लाकूड ताब्यात घेण्यात आले. कोणतीही परवानगी न घेता साग व इतर प्रजातीच्या सुमारे ७०० वृक्षांची बेकायदा तोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. २६४ घनमीटर इतका हा लाकूडसाठा वनविभागाने पकडला. ही कारवाई उपवनसंरक्षक डाॅ.भारतसिंह हाडा, विभागीय वनाधिकारी प्रकाशराव बागेवाडी यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details