कराड (सातारा)-संततधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 4 टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 58.95 टीएमसी झाला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी वीजनिर्मिती करून नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गुरूवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित करून कोयना नदीपात्रात 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पायथा वीजगृहातील दोन युनिट कार्यान्वित करून वीजनिर्मिती करून नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा-भारतात आणखी तीन राफेल दाखल; सलग ८ हजार किमीचा केला प्रवास
नवजामध्ये सर्वाधिक 148 मिलीमीटर पावसाची नोंद
कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर कोयना विभागातील कदमवाडी-नेचल गावांच्या दरम्यान काही ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी आल्यामुळे या मार्गावरून प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर होता. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक 33,914 क्युसेक झाली. चोवीस तासामध्ये कोयनानगरमध्ये 109 मिलीमीटर, नवजामध्ये 148 मिलीमीटर आणि महाबळेश्वरमध्ये 146 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 4 टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरणाची पाणी पातळी कमालीची वाढली असून कोयना धरणातील पाणीसाठा 58.95 टीएमसी झाला आहे. पावसाची संततधार आणि धरणातील वाढलेली आवक पाहता पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित करून कोयना नदीपात्रात 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. हेही वाचा-चक्क 5 पैशांमध्ये चिकन बिर्याणीची हॉटेलकडून ऑफर, पुढे असे धक्कादायक घडले...
मोरणा-गुरेघर प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले...
पाटण तालुक्यातील मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्पात 90 टक्के पाणीसाठा झाल्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी तीन वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत. बुधवारी दुपारपासून मोरणा प्रकल्पातून 1467 घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे कोयना खोर्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गोकूळ गावाला जोडणारा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली असून वाहतुकीसाठी या पुलाचा वापर करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाची संततधार आणि मोरणा प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे मोरणा नदीला पूर आला आहे. परिणामी, मोरणा नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे.