कराड (सातारा) - बिबट्याच्या हल्ल्यात २० वर्षाचा मुलगा जखमी झाल्याची घटना शेडगेवाडी-विहे (ता. पाटण) येथे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. ऋषिकेश अरविंद थोरात, असे मुलाचे नाव आहे.
जेवण केल्यानंतर घराबाहेर गेलेला ऋषिकेश रस्ता ओलांडताना अचानक समोर बिबट्या आला. त्यानंतर बिबट्याने ऋषिकेशवर हल्ला केला. आजुबाजूच्या मुलांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याचा पंजा लागल्याने ऋषिकेशच्या उजव्या मांडीला आणि हाताला जखम झाली आहे.