महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे द्विशतक; गुरुवारी 20 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह - सातारा कोरोना अहवाल

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 200 वर पोहोचला आहे.

corona
corona

By

Published : May 22, 2020, 7:39 AM IST

कराड (सातारा) - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 184 होती. परंतु, गुरुवारी रात्री 20 जणांचा अहवाल कोरोन पॉझिटिव्ह आल्यामुळे बाधितांचा आकडा 204 वर पोहोचला आहे.

कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे दाखल असलेला कलेढोण (ता. खटाव) येथील 45 वर्षीय पुरुष, उंब्रज (ता. कराड) येथील 40 वर्षीय पुरुष, कुंभारगाव (ता. पाटण) येथील 70 वर्षांचा वृद्ध आणि म्हावशी (ता. पाटण) येथील 45 वर्षीय पुरुष, अशा 4 जणांचा अहवाल गुरूवारी रात्री आठच्या सुमारास कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री उशीरा आलेल्या अहवालानुसार संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या सातारा जिल्ह्यातील आणखी 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

मुंबई येथून आलेला भीमनगर (ता. कोरेगाव) येथील 27 वर्षीय युवक, मायणी (ता. खटाव) येथील 64 वर्षीय पुरुष,‍ ‍धामणी (ता. पाटण) येथील 72 वर्षीय पुरुष, शामगाव (ता. कराड) येथील 24 वर्षीय तरुण, वरोशी (ता. जावली) येथील 52 वर्षीय ‍महिला, ‍ क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे दाखल असलेला मोजावाडी (ता. खटाव) येथील 53 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला आसरे (ता. वाई) येथील 50 वर्षीय पुरुष, गारवाडी (ता. खटाव) येथील 21 वर्षीय महिला, मुंबई येथून आलेला फलटण येथील 63 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली फलटण येथील 58 वर्षीय महिला, रायघर (ता. सातारा) येथील 26 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला कासखुर्द येथील 24 वर्षीय पुरुष, आसनगाव (ता. सातारा) येथील 36 वर्षीय पुरुष, निमसोड (ता. खटाव) येथील 20 वर्षीय व 48 वर्षीय पुरुष, कोपर खैरणे येथून आलेला गावडी (ता. जावली) येथील 19 वर्षीय तरूण, अशा एकूण 16 जणांचा अहवाल गुरूवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details