सातारा -राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना सातारा जिल्ह्याचा आकडा मात्र वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2 हजार 648 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहे. तर 31 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
खटावमध्ये रुग्णांचा वाढता आकडा
जावली 47, कराड 182, खंडाळा 362, खटाव 566, कोरेगाव 212, माण 207, महाबळेश्वर 39, पाटण 109, फलटण 515, सातारा 311, वाई 84 व इतर 14 असे तालुकानिहाय 2 हजार 648 नवे रुग्ण आढळले. आजपर्यंत एकूण 1 लाख 51 हजार 387 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले आहेत. विविध ठिकाणी 19 हजार 146 रुग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.