महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 2, 2020, 7:50 AM IST

ETV Bharat / state

साताऱ्यात एका दिवसात दोन कोरोनाबाधित वाढल्याने चिंता: जिल्ह्यात 276 संशयित दाखल

साताऱ्यात शुक्रवारी दोन संशयितांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या चार झाली आहे. शहराच्या मध्यवस्तीतील हे रहिवासी असल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आज 276 संशयित रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यात आले.

satara corona news
साताऱ्यात एका दिवसात दोन बाधित वाढल्याने चिंता: जिल्ह्यात 276 संशयित दाखल

सातारा - साताऱ्यात शुक्रवारी दोन संशयितांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या चार झाली आहे. शहराच्या मध्यवस्तीतील हे रहिवासी असल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आज 276 संशयित रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यात आले.

कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी महिलेचा वैद्यकीय अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ही महिला सातारा-कराड अशी रोज ये-जा करत होती. ती शहराच्या मध्यवस्तीत एका निवासी संकुलात ती रहाते. तिच्या फ्लॅटपासून हाकेच्या अंतरावर 27 वर्षीय युवकाचा अहवालही पाॅझिटिव्ह आला आहे.

हा युवक मुंबई येथे काम करत होता. लाॅकडाऊनच्या काळात, मुंबईहून 17 एप्रिलला तो साताऱ्यात परत आला. घरात विलगीकरणामध्ये तो होता. सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने काल त्याला जिल्हा रुग्णालयात भरती केले होते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.

कालच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील तंत्रज्ञ महिलेचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तेथील 24 आरोग्य कर्मचाऱ्यांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. शहरातील 3 बाधितांवर उपचार सुरू झाले आहेत. काॅलिफोर्नियाहून आलेल्या एका बाधिताचा यापुर्वीच मृत्यु झाला आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय 20, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय 71 व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 3 अशा 94 नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.

साताऱ्यात एका दिवसात दोन बाधित वाढल्याने चिंता: जिल्ह्यात 276 संशयित दाखल
सातारा जिल्ह्यात 45 रुग्ण बाधित रुग्ण असून आतापर्यंत 8 जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सातारा 43, कराड 217, कोरेगाव 16 अशा एकूण 276 नागरिकांना विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details