कराड (सातारा) - कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या बाबरमाची आणि चरेगाव (ता. कराड) येथील दोन कोरोनामुक्त रुग्णांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
कृष्णा हॉस्पिटलमधील आणखी दोन कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांचा गजरात डिस्चार्ज - गर्दीमुळे कोरोना प्रसाराची भीती
बाबरमाची येथील 32 वर्षीय युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो 18 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तर, कराडमधील उपजिल्हा रुग्णालयात 17 एप्रिल रोजी चरेगाव येथील एका 30 वर्षीय युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याला पुढील उपचारासाठी 25 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

तज्ज्ञ डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे हे दोन्हीही रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी या कोरोनामुक्त तरुणांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना हॉस्पिटलमधून निरोप दिला.