सातारा:पूर्व वैमनस्यातून एकावर तलवारीने वार करत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन युवकांना २४ तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पूर्व वैमनस्यातून खुनाचा प्रयत्न; २ युवक अटकेत
शनिवारी रात्री दोन संशयीतांनी हृशिकेश किरण गोसावी (वय ३०, रा.व्यंकटपूरा पेठ, सातारा) यांच्यावर पूर्व वैमनस्यातून तलवारीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या डोके, पाठ आणि पोटावर वार करण्यात आले होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शाहूकला मंदीराजवळ हा थरार घडला होता.
शनिवारी रात्री दोन संशयीतांनी हृशिकेश किरण गोसावी (वय ३०, रा.व्यंकटपूरा पेठ, सातारा) यांच्यावर पूर्व वैमनस्यातून तलवारीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या डोके, पाठ आणि पोटावर वार करण्यात आले होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शाहूकला मंदीराजवळ हा थरार घडला होता. गौरव राजन जाधव (वय २५ ) व सुमित विजय यादव (वय २४, दोघेही रा. व्यंकटपूरा पेठ सातारा) अशी संशयीतांची नावे आहेत. शाहूपुरी पोलिसांनी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. जखमी हृशिकेश यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलीस निरिक्षक मुगुट पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, उप निरीक्षक भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ तपास करत संशयीतांना ३ तासांच्या आत जेरबंद केले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले पुढील तपास करत आहेत.