सातारा -जिल्ह्यात पहिला कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आला आहे. रविवारी 45 वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. ही महिला कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दुबई येथून आलेल्या 45 वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रविवारी रात्री उशिरा अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास 15 वर्षांपासून आहे. त्यावर उपचार चालू आहेत, असे वैद्यकीय सुत्रांनी स्पष्ट केले. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला सध्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या महिलेचा अहवाल एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून प्राप्त झाला.