सातारा- जिल्ह्यात काल (मंगळवार) रात्री 12 वाजेपर्यंत 1 हजार 810 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहे. तर 34 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात 1 हजार 810 नवे रुग्ण ; 34 बाधितांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात एकूण 98 हजार 532 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आहेत. तर 2 हजार 422 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या
आज (बुधवार) अखेर बाधित रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे. जावली 77 (4627), कराड 202 (15222), खंडाळा 101 (6036), खटाव 200 (8450), कोरेगांव 139 (8224), माण 90 (5681), महाबळेश्वर 69 (3258), पाटण 73 (3994), फलटण 217 (12351), सातारा 507 (22674), वाई 114 (7499 ) व इतर 21 (516) असे एकूण 98 हजार 532 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आहेत.
तालुकानिहाय बळींची संख्या
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे. जावली 0 (96), कराड 4 (423), खंडाळा 0 (81),खटाव 0 (237), कोरेगांव 4 (229), माण 3 (133), महाबळेश्वर 1 (29), पाटण 1(115), फलटण 3 (179), सातारा 12 (720), वाई 6 (180) व इतर 0, असे एकूण 2 हजार 422 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.