सातारा - सातारा जिल्ह्यात आज कोरोनाने कहर केला. आज आणखी 18 रुग्ण पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबाबतची माहिती दिली. आज सकाळी 11 वाजेपर्यंत बाधीतांचा आकडा 95 होता. तो आता 113 वर पोहचला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 5 तर कराडमधील 13 बाधितांची भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप 18 बाधितांचा तपशिल सविस्तर जाहीर केलेला नाही.
साताऱ्यात आजपर्यंत 2 हजार 393 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 14 जण उपचारांती कोरोनामुक्त झाले आहेत तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. बाधितांवर सातारा येथील व सातारा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कराड येथील उपजिल्हा रुग्णालय व कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
धक्कादायक..! सातारा जिल्ह्यात आणखी 18 कोरोनाग्रस्त, बाधितांचा आकडा शंभरी पार - पाॅझिटिव्ह
आज साताऱ्यात 18 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 113 वर पोहोचली आहे.
शासकीय रुग्णालय सातारा