ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा कोरोना अपडेट : शुक्रवारी 1 हजार 742 बाधितांची नोंद; 34 मृत्यू - सातारा कोरोना लेटेस्ट अपडेट

गुरूवारी रात्रीचा अहवाल शुक्रवारी सकाळी आला. त्यात 1,742 इतके पॉझिटिव्ह आले असून रुग्ण बरे होण्याचा दर 35.06 टक्के इतका आहे.

Satara corona update
सातारा कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 24, 2021, 10:56 AM IST

सातारा -शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 1 हजार 742 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 35 टक्के -

गुरूवारी रात्रीचा अहवाल शुक्रवारी सकाळी आला. त्यात 1,742 इतके पॉझिटिव्ह आले असून रुग्ण बरे होण्याचा दर 35.06 टक्के इतका आहे. त्यामुळे बाधितांचे प्रमाण कायम आहे. गुरुवारी उच्चांकी 1 हजार 815 या आकड्याच्या तुलनेत शुक्रवारी किंचित कमी वाढ झाली. तर जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या 1 हजार 670 नागरिकांना घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत 2 हजार 290 जणांचा मृत्यू झाला असून 15 हजार 94
उपचार घेत आहेत.

34 बाधितांचा मृत्यू -

जिल्ह्यात गेल्या 24 तासात रहिमतपूर (ता.कोरेगाव) येथील 60 वर्षीय महिला, अतित (ता. सातारा) येथील 72 वर्षीय महिला, पिंपोडे (ता. कोरेगाव) येथील 50 वर्षीय महिला, सातारा येथील 55 वर्षीय महिला, महागाव (ता. सातारा) येथील 81 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 85 वर्षीय महिला, केसरकर पेठेतील 2 , मंगळवार पेठेतील 73 वर्षीय महिला, तडवळे (ता. कोरेगाव) येथील 76 वर्षीय पुरुष, गजवडी (ता. सातारा) येथील 50 वर्षीय महिला, मुंबई येथील 58 वर्षीय महिला, सोळशी (ता. कोरेगाव) येथील 31 वर्षीय पुरुष, कात्रज, पुणे येथील 40 वर्षीय महिला, सायगाव (ता.जावली) येथील 79 वर्षीय पुरुष, फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, खबालवाडी (ता. खटाव) येथील 47 वर्षीय पुरुष, कर्मवीरनगर (ता. सातारा) येथील 55 वर्षीय पुरुष, बोपेगाव (ता. वाई) येथील 65 वर्षीय पुरुष, तोंडोली (ता.कडेगाव सांगली) येथील 60 वर्षीय महिला, कराड येथील 52 वर्षीय महिला, पोतेकरवाडी (ता. पाटण) येथील 70 वर्षीय पुरुष, काळे (ता. कराड) येथील 72 वर्षीय महिला, कर्वे नाका, कराड येथील 47 वर्षीय पुरुष, वरुड (ता. खटाव) येथील 76 वर्षीय पुरुष, वडी (ता. खटाव) येथील 60 वर्षीय पुरुष, बरड (ता. फलटण) येथील 53 वर्षीय महिला, तांबवे लोणंद (ता. खंडाळा) येथील 27 वर्षीय पुरुष, बिदाल (ता माण) येथील 70 वर्षीय महिला, काण्हरवाडी (ता. खटाव) येथील 49 वर्षीय पुरुष, येराळवाडी (ता. माण) येथील 75 वर्षीय महिला, मायणी (ता. खटाव) येथील 75 वर्षीय पुरुष, बावधन (ता. वाई) येथील 60 वर्षीय महिला, वाई येथील 11 वर्षीय युवक अशा एकूण 34 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हाबंदीची तयारी -

जिल्ह्याच्या सीमांवर पोलीस दलाकडून जिल्हाबंदीची तयारी सुरू केली आहे. सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतूक याबाबत निर्बंध असून याबाबत पोलीस दलाची तयारी सुरू आहे. परजिल्ह्यातून येेेणारे जे प्रवाशी आहेत त्यांच्यावर पोलिसांची नजर असणार आहे. जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्केही मारण्यात येणार आहेत.

फेक मेसेजप्रकरणी कारवाईचा इशारा -

जीवनावश्यक वस्तू बंद, वृत्तपत्रे बंद अशा आशयाचे मेसेज जिल्हाधिकारी यांच्या नावाने पसरवण्यात येत आहेत. अशी कोणतीही माहिती वा संदेश पुणे विभागातील जिल्हाधिकारी यांच्याकडून काढण्यात आलेेेला नाही. हा संदेश खोटा असून अशा आपत्तीच्या काळात लोकांची दिशाभूल होईल, असा कोणताही मजकूर खोडसाळपणे पसरविणारे असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने ही दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details