सातारा :वाई तालुक्यात एका १७ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली (17 year old boy killed in Satara ) आहे. न्यास शिवाजी खरात, असे खून झालेल्या मुलाचे नाव असून तो सिद्धनाथवाडी गावातील आहे. या घटनेने वाई तालुक्यात खळबळ उडाली असून फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले ( Forensic Team Dog Team On The Spot ) आहे.
Crime In Satara : १७ वर्ष मुलाचा अज्ञाताकडून खून, फॉरेन्सिक टीमचा श्वान पथकाकडून तपास सुरू - १७ वर्ष मुलाचा अज्ञाताकडून खून
वाई तालुक्यात एका १७ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने वारकरून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली (17 year old boy killed in Satara ) आहे. या घटनेनंतर घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक दाखल झाले ( Forensic Team Dog Team On The Spot ) आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलाच्या हत्येने पोलीस चक्रावले :अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची माहिती मिळताच वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. खुनाची माहिती सिद्धनाथवाडी ग्रामस्थांनी पोलिसांनी दिली असून अल्पवयीन मुलाच्या हत्येने पोलीस देखील चक्रावून गेले ( Police investigating Murder ) आहेत.
फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक दाखल : वाई पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकास पाचारण केले. दोन्ही टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. न्यास खरात याचे कोणाशीही वैर ( Boy Stabbed With Sharp Weapon ) नव्हते. तसेच त्याला पोलीस दलात भरती व्हायचे होते. त्यासाठी तो तयारी करत होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.