महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात आढळले कोरोनाचे 1543 नवे रुग्ण, 38 बळी

साताऱ्यात 1 हजार 543 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर कोरोनाने 38 बाधितांचा बळी घेतला आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी ही माहिती दिली.

साताऱ्यात आढळले कोरोनाचे 1543 नवे रुग्ण, 38 बळी
साताऱ्यात आढळले कोरोनाचे 1543 नवे रुग्ण, 38 बळी

By

Published : Apr 18, 2021, 9:08 AM IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार साताऱ्यात 1 हजार 543 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर कोरोनाने 38 बाधितांचा बळी घेतला आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी ही माहिती दिली.

जिल्ह्यात 11706 सक्रीय रुग्ण

विविध चाचण्यांतून जिल्हाभरातून तब्बल 6 हजार 426 नमूने घेण्यात आले. सर्वात जास्त 3 हजार 318 रॅपीड अँटीजन टेस्ट केल्या असून त्यापैकी 884 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांचा दर 24.01 टक्के इतका आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या 480 नागरिकांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे 11 हजार 706 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 2 हजार 81 बाधितांचा मृत्यु झाला आहे.

38 बाधितांचा मृत्यु
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे भुईंज (ता. वाई) येथील 80 वर्षीय महिला, चांदक (ता. वाई) येथील 65 वर्षीय पुरुष, भरतगाव (ता. सातारा) येथील 68 वर्षीय पुरुष, नागाचे कुमटे (ता. खटाव) येथील 42 वर्षीय पुरुष, खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, सदरबाजार येथील 80 वर्षीय पुरुष, बापुदासनगर (ता.फलटण) येथील 70 वर्षीय पुरुष, रनदुल्लानगर (ता. कोरेगाव) येथील 65 वर्षीय पुरुष, काळचौंडी (ता. माण) येथील 60 वर्षीय महिला व जिल्हयातील विविध खाजगी कोविड हॉस्पिटल मध्ये चिखली (ता. कराड) येथील 53 वर्षीय महिला, मलकापुर (ता. कराड) येथील 70 वर्षीय पुरुष, अभयाचीवाडी (ता. कराड) येथील 46 वर्षीय पुरुष, घारेवाडी (ता. सातारा) येथील 55 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 55 वर्षीय महिला, भोळी (ता. खंडाळा) येथील 64 वर्षीय पुरुष, तामीणी (ता.पाटण) येथील 48 वर्षीय पुरुष, गोळेश्वर (ता. कराड) येथील 32 वर्षीय पुरुष, रासाटी (ता. पाटण) येथील 72 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 60 वर्षीय पुरुष, कोडवली (ता. फलटण) येथील 76 वर्षीय पुरुष, लिंगमळा (ता. महाबळेश्वर) येथील 70 वर्षीय पुरुष, कर्वेनगर पुणे येथील 61 वर्षीय पुरुष, नागठाणे (ता. सातारा) येथील 68 वर्षीय पुरुष, खोजेवाडी (ता. सातारा) येथील 73 वर्षीय महिला, लिंब (ता. सातारा) येथील 70 वर्षीय महिला, लडेगाव (ता. खटाव) येथील 76 वर्षीय पुरुष, सैदापुर (ता. कराड) येथील 72 वर्षीय पुरुष, सातारा येथील 59 वर्षीय पुरुष, भोसे (ता. कोरेगाव) येथील 70 वर्षीय पुरुष, खटाव (ता. खटाव) येथील 79 वर्षीय पुरुष, पुसेसावळी (ता. खटाव) येथील 65 वर्षीय महिला, विरवडे (ता. माण) येथील 33 वर्षीय पुरुष, खावली (ता. वाई) येथील 60 वर्षीय पुरुष, बोरगाव (ता. वाई) येथील 65 वर्षीय महिला, धर्मपुरी (ता. वाई) येथील 65 वर्षीय पुरुष, मलकापुर (ता. कराड) येथील 51 वर्षीय पुरुष, जावळी (ता. जावळी) येथील 51 वर्षीय पुरुष, ओंड (ता. कराड) येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण 38 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details