कराड (सातारा) - जिल्ह्यातील आणखी 15 जणांचे अहवाल बुधवारी रात्री उशिरा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कराड तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे. तथापि, कोरोनामुक्त होणार्यांची संख्या वाढत असताना प्रवास करून आलेल्यांचे अहवाल कोरानाबाधित येऊ लागल्याने प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 181 वर पोहोचला आहे.
सातारा जिल्ह्यात आणखी 15 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 181
कोरोनामुक्त होणार्यांची संख्या वाढत असताना प्रवास करून आलेल्यांचे अहवाल कोराना पॉझिटिव्ह येऊ लागल्याने प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली आहे.
कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने कराड तालुक्यात आनंदाची लहर होती.23 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेल्याची आनंदवार्ता असतानाच कराड तालुक्यातील चार जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये भरेवाडी दोन आणि इंदोली, म्हासोलीतील प्रत्येकी एकजण होता. पुन्हा रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातील आणखी 11 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
पाटण तालुक्यातील भारसाखळे येथील महिलेचा मृत्यू झाला असून तिच्यावर कोरोना संशयीत समजून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्रलंबित आहे.