सातारा - भैरवगड जवळच्या टोळेवाडी, मानेवाडी, पिरेवाडी आणि गवळणवाडी या चार वाड्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या भेगा पडल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच येथील लोकांची भैरवगड व आसपासच्या गावांमधील घरांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
भैरवगड परिसरातील चार वाड्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जमिनीला भेगा, 123 कुटुंबांचे केले स्थलांतर
सातारा जिल्ह्यातील चार वाड्यांना अतिवृष्टीमुळे मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 123 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. या कुटुंबांची तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली आहे.
भैरवगडलगतच्या चार वाडयांना अतिवृष्टीमुळे भेगा पडल्या आहेत
चार वाड्यांमधील शेती आणि घरांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश-
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या चार वाड्यांतील शेता आणि घरांचे लवकरात-लवकर पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले आहेत. अतिवृष्टी बाधीतांना त्यांच्या मागणीनुसार जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करा. तसेच येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी 24 तास आरोग्य पथक कार्यरत ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.