महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यातील 12 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या झाली 92 - 92 corona positive in satara

सध्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 3 बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले.

corona in satara
corona in satara

By

Published : May 6, 2020, 2:21 PM IST

कराड (सातारा)- जिल्ह्यात 12 जणांचे कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8, अशा एकूण 12 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 92 झाली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमधील 11 जण हे निकट सहवासित आहेत. फलटण येथील केअर सेंटरमधील एका महिला आरोग्य सेविकेचाही यामध्ये समावेश आहे. कराड तालुक्यात आज आणखी १० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. वनवासमाची गावात 7, साकुर्डीत 2 आणि खोडशी गावात 1 बाधित रुग्ण सापडला आहे.

मृत्यू झालेल्या 'त्या' दोघांचा अहवाल निगेटिव्ह...

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 4 एप्रिल रोजी सारी सदृष्य आजाराने मृत्यु झालेल्या दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

कोरोनामुक्त झालेल्या तिघांना आज घरी सोडणार...

सध्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 3 बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले.

116 जाणांचे अहवाल निगेटिव्ह

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 48 आणि कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 68 असे एकूण 116 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचेही बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळवले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details