कराड (सातारा) - कोरोनाबाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून, कृष्णा हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या आणखी ७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. फक्त कराडमध्ये एका दिवसात १२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कराडमधील बाधित रूग्णांची संख्या २३ आणि सातारा जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३३ झाली आहे.
कराडमध्ये एका दिवसात १२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
कराडमधील ५ जणांचे अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. त्यातच कृष्णा हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या आणखी ७ जणांचे अहवाल सायंकाळी कोरोना पॉझिटीव्ह आले.
कराडमध्ये एका दिवसात १२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह
कराडमधील ५ जणांचे अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. त्यातच कृष्णा हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या आणखी ७ जणांचे अहवाल सायंकाळी कोरोना पॉझिटीव्ह आले. त्यामुळे प्रशासन हादरून गेले आहे. प्राथमिक तपासण्यानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असून, विलगीकरण कक्षात लागू असलेल्या सर्व नियमानुसार त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे.