सातारा -वाई शहरातील १२ चारचाकी गाड्यांची अज्ञाताने मोडतोड करून गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर वाई शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सातार्यातील वाई शहरात अज्ञाताकडून मध्यरात्री १२ गाड्यांची तोडफोड - वाई क्राईम न्यूज
वाई शहरातील १२ चारचाकी गाड्यांची अज्ञाताने मोडतोड करून गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर वाई शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड -वाई शहरातील रविवार पेठ, रामडोह आळी व ब्राम्हणशाही भागात अज्ञाताकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. घराबाहेर रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तसेच गाड्यांची मोडतोडही केली आहे. या घटनेमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाई शहरात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञाताने सुमारे बारा वाहनांच्या काचा फोडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू -गाड्यांच्या तोडफोड प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. एखाद्या मद्यपीने दारूच्या नशेत हे कृत्य केले असावे, असा पोलिसांना संशय आहे. संबंधिताचा तातडीने शोध लावून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा विश्वास वाई पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे हे या घटनेचा तपास करत आहेत.