सातारा - तालुक्यातील येरवळे गावात भर दुपारी आग लागल्याने 12 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विलास बाळू यादव असे शेतमालकाचे नाव आहे. घटनेत 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील 12 एकर ऊस पेटला; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान - उसाला आग
वाळलेल्या उभ्या पीकाला भर दुपारी आग लागून उन्हामुळे ती वेगात पसरली. विलास बाळू यादव यांचा 12 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला आहे.
हेही वाचा -सांगलीत ऊस दर आंदोलनाची ठिणगी, एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक
आत्ता कुठे ऊसतोड मजुर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येऊ लागले आहे. काही ठिकाणी शेतात अजुनही पाणी आणि ओल आहे. त्यामुळे ऊसतोडी सुरू करण्यासाठी बर्याच ठिकाणी अडचणी येत आहेत. ओल असल्यामुळे ऊस वाहतूक करणारे वाहन शेतात जाण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे कारखान्यांनीही गळीत हंगाम सुरू केलेला नाही. वाळलेल्या उभ्या पिकाला भर दुपारी आग लागून उन्हामुळे ती वेगात पसरली. हातातोंडाशी आलेले उसाचे पीक आगीत खाक झाल्यामुळे विलास यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे. या घटनेचा कराड शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.