महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यातील १ हजार १५३ धोकादायक गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर, नूतन पोलीस अधीक्षक बन्सल यांचे संकेत - सातारा पोलीस अधीक्षक बातमी

कराड येथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर चालणारा हायप्रोफाईल जुगार बेटींग सट्टा चालविणाऱ्या ४ जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एलसीडी टीव्ही, सेट टॉप बॉक्स, लॅपटॉप, ९ मोबाईल, वाहने व जुगाराचे साहीत्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुसेगांव येथील सराईत गुन्हेगार नितीन खरात यास ताब्यात घेवुन कारवाई करण्यात आली. त्याच्यावर यापुर्वी सातारा, पुणे, सांगली, जिल्ह्यांत विविध १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात घरफोडीचे ८, जबरी चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आले. सातारा जिल्ह्यासह, कर्नाटक, गुजरात या राज्यांत एटीएम उचकटून रक्कम काढून घेणारी आंतरराज्यीय टोळीचा शाहुपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला असल्याचे बन्सल यांनी सांगितले.

1153 dangerous criminals in the district on radar of new sp bansal
नूतन पोलीस अधीक्षक बन्सल यांचे संकेत

By

Published : Oct 19, 2020, 10:04 PM IST

सातारा -जिल्ह्यामधील धोकादायक १ हजार १५३ गुन्हेगारांची यादी तयार करुन त्यांच्यावर मोक्का/एमपीडीए/हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नूतन पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. सातारा जिल्ह्याची सुत्रे स्वीकारल्यानंतर आज प्रथम बन्सल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

यावेळी ते म्हणाले, की जिल्ह्यात पोलिसांनी बेकायदा दारू व जुगार अड्ड्यांवर छापे मारुन 163 गुन्हे दाखल केले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये दोन व दोन पेक्षा जास्त गुन्हे करणार‍ांचा समावेश आहे. या यादीत एकूण २७६६ गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांच्यावर नजर ठेवून प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

कराड येथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर चालणारा हायप्रोफाईल जुगार बेटींग सट्टा चालविणाऱ्या ४ जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एलसीडी टीव्ही, सेट टॉप बॉक्स, लॅपटॉप, ९ मोबाईल, वाहने व जुगाराचे साहीत्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुसेगांव येथील सराईत गुन्हेगार नितीन खरात यास ताब्यात घेवुन कारवाई करण्यात आली. त्याच्यावर यापुर्वी सातारा, पुणे, सांगली, जिल्ह्यांत विविध १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात घरफोडीचे ८, जबरी चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आले. सातारा जिल्ह्यासह, कर्नाटक, गुजरात या राज्यांत एटीएम उचकटून रक्कम काढून घेणारी आंतरराज्यीय टोळीचा शाहुपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला असल्याचे बन्सल यांनी सांगितले.

सातारा तालुका पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्याकडून सातारा तालुका, सातारा शहर, रहीमतपुर, कोल्हापूर जिल्ह्यातील इचरकरंजी, राधानगरी अशा पाच पोलीस ठाणे हद्दीतून ट्रक चोरल्याची कबुली दिलेली असून तपास चालु आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या २ व्यक्तींना ताब्यात घेवुन त्यांच्याकडून ३ रिव्हॉलव्हर व ३ काडतुसे स्थानिक गुन्हे शाखा तसेच पाटण पोलीस ठाणे अंतर्गत कारवाई करुन हस्तगत करण्यात आली. कराड शहर व परिसरातील धोकादायक सराईत गुन्हेगार अमीर शेख (रा. कराड, ता कराड) याचेवर एमपीडीए अंतर्गत केलेली कारवाई सल्लागार मंडळाने मंजुरी देवून कायम केलेली असल्याचे बन्सल यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details