सातारा - माण तालुक्यात अकरा चारा छावण्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित चार छावण्यांचे प्रस्ताव लवकरच मंजूर होतील, अशी माहिती पुरवठा विभागातून मिळाली आहे. चारा छावण्यांची मागणी नागरिकातून अनेक दिवसांपासून होत होती. या मंजुरीमुळे त्यांना तूर्तास दिलासा मिळणार आहे.
माण तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला, ११ चारा छावण्यांना मंजूरी - camp
दुष्काळाचे भीषण वास्तव सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे. या भीषण परिस्थितीत माणमधील पशुपालक २५ जानेवारीपासून चारा छावण्या चालू करण्याची मागणी शासनाकडे करत होते. पण, प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे जनतेमधून नाराजीचा सूर होता.
दुष्काळाचे भीषण वास्तव सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे. या भीषण परिस्थितीत माणमधील पशुपालक २५ जानेवारीपासून चारा छावण्या चालू करण्याची मागणी शासनाकडे करत होते. पण, प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे जनतेमधून नाराजीचा सूर होता. आता मार्च महिना उलटल्यानंतर माण तालुक्यात छावण्यांना मंजुरी दिली आहे.
चारा छावण्या मंजूर झालेल्या गावांमध्ये मलवडी, आंधळी, जाधववाडी, मोगराळे, बिजवडी, वडगाव, हवालदारवाडी, माळवाडी, वाकी, अनभुलेवाडी, शेनवडी या गावांचा समावेश आहे. पशुपालकांना या मंजुरीमुळे दिलासा मिळाला आहे. उर्वरित महसूल विभागात चारा छावण्या लवकर मंजूर कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.