सातारा -अतिवृष्टी झालेल्या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून सातारा जिल्ह्याला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबर या घटनेतील मृतांच्या वारसांना सात लाख रुपयांची मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी त्यांच्या शेताजवळील जागांचा शोध घ्यावा. तसेच पुनर्वसनासाठी निवडलेल्या संबंधित जागेबाबत तज्ञांचा सल्ला घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना केल्या.
सातारा जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मोरी बांधण्याऐवजी स्लॅबचे पूल -
अजित पवार म्हणाले, नैसर्गिक घटनांशी सामना करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या बोटी व वस्तूंची खरेदी करा. दरवर्षी जोरदार पावसाने दुर्गम भागात ओढे व नाल्यावरील ब्रिटिशकालीन मोरी वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे, अनेक गावे संपर्कहीन होताना दिसून येत आहे. या दुर्घटना टाळण्यासाठी मोरी बांधण्याऐवजी स्लॅबचे पूल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधावेत. तसेच, गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे आठवडाभरात पूर्ण करा. बाधित नागरिकांना चांगली घरे दिली जातील. कोयना वसाहतीतील घर दुरुस्तीसाठी निधी देणार आहे. याचबरोबर भूस्खलन झालेल्या लोकांना महसूल आणि वनविभागाच्या जागा उपलब्ध करून द्या.
अजिंक्यताऱयाबाबत सर्व्हे करा-