कराड (सातारा) -कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे दाखल असलेल्या दहा वर्षाच्या मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचार घेताना मृत्यू झालेल्या परिचारिकेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्या सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील कोरोना कक्षात कार्यरत होत्या.
कराडमधील दहा वर्षांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह तर 'त्या' मृत परिचारिकेचा अहवाल निगेटिव्ह - covid 19
सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील कोरोना कक्षात काम करणाऱ्या परिचारिकेचा कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला होता. आता कराडमधील दहा वर्षांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील कोरोना कक्षात काम करणाऱ्या परिचारिकेचा कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला होता. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 15, कृष्णा रुग्णालय, कराड येथील 16, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 आणि ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 12, असे एकूण 44 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचेही बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 10, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 47, ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 1 व कोरेगाव येथे 14, अशा एकूण 72 जणांना गुरूवारी अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच 73 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.