महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 10 नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश - kolhapur bjp news

माथेरान नगरपरिषदेमधील एकाच वेळी 10 नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने माथेरानमधील एकूणच सत्ता समीकरण बदलले आहे.

10 Shiv Sena corporators join BJP in Kolhapur
कोल्हापुरात शिवसेनेच्या 10 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

By

Published : May 27, 2021, 10:23 PM IST

Updated : May 28, 2021, 9:47 AM IST

कोल्हापूर -माथेरान नगरपरिषदेमधील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला. एकूण 14 नगरसेवकांपैकी दहा नगरसेवकांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा केला. या दहा जणांमध्ये उपनगराध्यक्षाचा सुद्धा समावेश आहे.

कोल्हापुरात शिवसेनेच्या 10 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

हेही वाचा -'तौक्ते'तील नुकसानग्रस्तांना पॅकेज जाहीर, तर चंद्रपुरातील दारूबंदी उठवली; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय!

शिवसेनेला जबर धक्का

एकाच वेळी 10 नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या नगरसेवकांमध्ये आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष) राकेश चौधरी, सोनम दाबेकर, ज्योती सोनवणे, चंद्रकांत जाधव, संदीप कदम, प्रतिभा घावरे, सुषमा जाधव, प्रियंका कदम, रूपाली आखाडे यांचा समावेश असून यांचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 14 पैकी 10 जणांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने माथेरानमधील एकूणच सत्ता समीकरण बदलले आहे.

Last Updated : May 28, 2021, 9:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details