महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यातील 10 दुय्यम निबंधक कार्यालये सुरू - दुय्यम निबंधक कार्यालय न्यूज

दुय्यम निबंधक फलटण क्र. 1 व फलटण क्र. 2, दुय्यम निबंधक जावळी-मेढा, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, माण-दहिवडी, खटाव-वडूज, कोरेगांव व पाटण ही कार्यालये सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

revenue-department
जिल्ह्यातील 10 दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

By

Published : May 13, 2020, 1:35 PM IST

सातारा - जिल्ह्यात एकूण 15 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. यातील प्रतिबंधित क्षेत्रामधील 5 कार्यालये सोडून उर्वरि10त 10 कार्यालये सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील 10 दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

दुय्यम निबंधक फलटण क्र. 1 व फलटण क्र. 2, दुय्यम निबंधक जावळी-मेढा, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, माण-दहिवडी, खटाव-वडूज, कोरेगांव व पाटण ही कार्यालये सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यावरून आज ही कार्यलाय सुरू करण्यात आले आहेत.

यामध्ये आज दुय्यम निबंधक सातारा क्र.1, सातारा क्र. 2, दुय्यम निबंधक कराड क्र.1, कराड क्र.2, व उंब्रज ही 5 कार्यालये प्रतिबंधित क्षेत्रामधील असल्याने ही कार्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, असेही आदेशात म्हटले आहे. कार्यालय सुरू असताना दुय्यम निबंधक यांनी प्रत्येक कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राहील याची काळजी घ्यावी. तसेच सॅनिटायझर, मास्कचा वापर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

आज दिवसभारत अनेक ठिकाणी दस्त झाले नसल्याचे सांगितले जात आहे. तर काही ठिकाणी स्टँप विक्रते नसल्याने या ठिकाणी नागरिकांना दस्तऐवज व कागदपत्रे मिळत नसल्याचे नागरिक सांगत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details