कराड -पाटण तालुक्यातील कोयनानगरचा परिसर कोरोनाचा हॉट्सस्पॉट ठरला आहे. आतापर्यंत या भागात कोरोनाने १३ जणांचा बळी घेतला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक झाला असताना रासाटी गावात डीजे लावून लग्न लागले. यानंतर या लग्न सोहळ्याशी संबंधित असणाऱ्या लोकांना पाटण तहसीलदारांनी १० हजाराचा दंड आकारला. तर गटविकास अधिकार्यांनी गोषटवाडीत क्रिकेट खेळणार्या तरुणांना ताब्यात घेतले.
पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. असेच रासाटी (ता. पाटण) येथे परिसरात एका लग्नात डीजे लावून मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे निदर्शनास आले. यानंतर पाटणचे तहसीलदार योगेश टोम्पे आणि गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी या लग्न सोहळ्यातील संबंधित व्यक्तींवर कारवाई केली. दरम्यान लग्न समारंभाच्या मालकास १० हजाराचा दंड ठोठावला.