कराड (सातारा)-अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहोळ्याचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या १० जणांना कराड शहर पोलिसांनी काल ताब्यात घेतले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड येथे राम मंदिर आनंदोत्सव साजरा करणे पडले महागात, १० जणांना अटक - 10 arrested curfew break karad
कराडमध्ये 10 जणांनी पेढे, जिलेबी, लाडू वाटप व फटाके फोडून जमावबंदीचे उल्लंघन केले. त्यामुळे, पोलिसांनी दहाही जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी ६ जण अल्पवयीन मुले आहेत.

अयोध्या येथे काल (5 ऑगस्ट) राम मंदिराचे भूमिपूजन झाले होते. या पार्श्वभमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काल जिल्ह्यात कलम 144 लागू केली होती. मात्र, कराडमध्ये 10 जणांनी पेढे, जिलेबी, लाडू वाटप व फटाके फोडून जमावबंदीचे उल्लंघन केले. त्यामुळे, पोलिसांनी दहाही जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी ६ जण अल्पवयीन मुले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्याद दिली असून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-पावसाचा जोर वाढला; गेल्या 24 तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 6 टीएमसीने वाढ