सातारा- सातारा जिल्ह्यात कोमॉर्बिड सर्व्हेक्षणांतर्गत कोविड-19 सदृष्य लक्षणे असलेले 1 हजार 936 रुग्ण आढळून आले. या नागरिकांच्या आरोग्यावर, आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रीत केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. आशाताई-अंगणवाडी सेविकांनी सर्वे केला असून, जिल्ह्यातील 1 हजार 497 ग्रामपंचायतींमध्ये सेविकांच्यामार्फत दररोज केल्या जाणाऱ्या सर्व्हेक्षणांत ही माहिती पुढे आली आहे. सातारा जिल्ह्यात आशा व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून दररोज 25 ते 40 व्याधीग्रस्त नागरिकांचा सर्व्हे केला जात असून, यामध्ये विविध लक्षण असणारे नागरिक व 94 पेक्षा कमी ऑक्सिजन असणाऱ्या नागरिकांना शोधून त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तात्काळ कोविड टेस्ट केली जात आहे.
खटाव तालुक्यात सर्वाधिक बाधित
साताऱ्यात कोरोना सदृष्य लक्षणे असलेले हजारावर रुग्ण
सातारा जिल्ह्यात कोमॉर्बिड सर्व्हेक्षणांतर्गत कोविड-19 सदृष्य लक्षणे असलेले 1 हजार 936 रुग्ण आढळून आले. या नागरिकांच्या आरोग्यावर, आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रीत केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
कोमॉर्बिड सर्व्हेक्षण