सातारा - जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 878 नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून 31 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
हेही वाचा -साताऱ्यात म्यूकरमायकोसिसचा उद्रेक; 28 रुग्ण, 3 मृत्यू
17 हजार 820 रुग्ण अॅक्टिव्ह
सातारा तालुका नेहमीप्रमाणे बाधितांच्या संख्येत आघाडीवर आहे. काल सर्वाधिक 395 बाधित आढळले. या शिवाय फलटण 332, कराड 222, कोरेगाव 220, खंडाळा 88, खटाव 150, माण 135, वाई 169, जावली 103, महाबळेश्वर 7, पाटण 46 व इतर 11, असे आज 1 हजार 878 नवे बाधित आढळले. सध्या 17 हजार 820 रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत.
3 हजार 390 कोरोनाचे बळी
आजअखेर एकूण 1 लाख 46 हजार 656 नागरिकांचे अहवाल पाझिटिव्ह आले आहेत. आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये जावली 3, कराड 6, खटाव 6, कोरेगाव 2, माण 3, फलटण 2, सातारा 8, वाई 1 यांचा समावेश आहे. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 390 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
1 हजार 663 नागरिकांना डिस्चार्ज
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 1 हजार 663 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 लाख 46 हजार 656 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. उपचार पूर्ण झाल्याने 1 लाख 25 हजार 433 जणांना घरी सोडण्यात आले.
हेही वाचा -नुकसानग्रस्तांना मदत मिळत नाही, म्हणून आम्ही "वैफल्यग्रस्त"