सातारा- जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 792 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून, 34 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. सातारा जिह्यातील फलटण तालुक्यात सर्वाधिक बाधित आढळले आहेत.
जावली 51, कराड 185, खंडाळा 109, खटाव 158, कोरेगांव 208, माण 137, महाबळेश्वर 6, पाटण 66, फलटण 342, सातारा 342, वाई 176 व इतर 12 असे तालुकानिहाय बाधित आढळले आहेत.आज अखेर एकूण 1 लाख 43 हजार 61 इतकी कोरोना बाधित रूग्णसंख्या आहे.
तब्बल 1 लाख 20 हजार 646 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत
गुरुवारी मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये कराड 8, सातारा 9, माण 6, खटाव 4, वाई 3, कोरेगांव 2 व पाटण आणि खंडाळा प्रत्येकी 1 यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 328 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 19 हजार 82 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तब्बल 1 लाख 20 हजार 646 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रूग्णांपैकी 1828 कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
हेही वाचा-राज्यात गुरुवारी 47 हजार 371 जण कोरोनामुक्त; 29 हजार 911 नवे बाधित