सातारा- राज्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान शून्य अंश सेल्सियसवर गेले आहे. आज पहाटे परिसरात अनेक ठिकाणी बर्फची चादर पाहायला मिळाली.
महाबळेश्वर पुन्हा गारठले, पारा शून्य अंशावर - सातारा
सकाळी महाबळेश्वरमधील तापमानात कमालीची घट झाली. दवबिंदू गोठल्याने स्ट्रॉबेरीच्या पानावरती बर्फ तयार झाला होता.
स्ट्रॉबेरीच्या पानांवर गोठलेले दवबिंदू
जिल्ह्यातील सर्व भागात रात्री पासून कडाक्याच्या थंडीची लाट पसरली आहे. अनेक भागात पारा कमी झालेला पहिला मिळतो आहे. आज सकाळी महाबळेश्वर मधील तापमानात कमालीची घट झाली. दवबिंदू गोठल्याने स्ट्रॉबेरीच्या पानावरती बर्फ तयार झाला होता. यापूर्वी दीड महिन्यांआधी पारा शून्य अंशावर गेला होता.