महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#COVID19 : जिल्हा परिषद कर्मचारी देणार एक दिवसाचा पगार, शंभर कोटींचा निधी होणार संकलित

कोरोना आपत्तीसाठी मदत म्हणून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी एक दिवसाचा पगार देण्यात येणार आहे.

By

Published : Mar 28, 2020, 3:09 PM IST

सांगली जिल्हा परिषद
सांगली जिल्हा परिषद

सांगली- कोरोना आपत्तीसाठी मदत म्हणून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी एक दिवसाचा पगार देणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. यामुळे 100 कोटींच्यावर रक्कम जमा होईल, असा विश्वास कर्मचारी युनियनचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष पोपटराव खरमाटे यांनी व्यक्त केला आहे.

माहिती देताना युनियचे राज्याध्यक्ष पोपटराव खरमाटे

राज्यातील जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी, पंचायत समितीतील आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचारी असे एकूण 7 लाखांच्या आसपास कर्मचारी आहे. हे सर्वजण आपला 1 दिवसाचा पगार देणार आहेत. यातून जवळपास 100 कोटींचा निधी जमा होईल. हा निधी कोरोनाला रोखण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या रुग्णालयात, अत्यावश्यक सामग्रीसाठी खर्च करण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष पोपटराव खरमाटे यांनी दिली आहे.

हेही वाचा -लॉकडाऊन : वाहतुकीची सोय नसल्याने शेतकऱ्याने नष्ट केले टोमॅटो आणि कोबीचे पीक

ABOUT THE AUTHOR

...view details