महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

5 हजार मुलींनी एकत्रित 'युवती सक्षमीकरणाचे' घेतले प्रशिक्षण; 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद - India Book of Record sangali

मुलींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, मनोबल भक्कम करणे, चांगले मित्र-मैत्रिणी ओळखण्याची कला आत्मसात करणे, परिवारालाही मित्र मानणे, टेक्नोलॉजीचा गैरवापर कसा केला जातो हे समजाविणे इत्यादी बाबींचे त्यांना प्रशिक्षण दिले जाते.

सांगली
सांगली

By

Published : Jan 25, 2020, 9:39 AM IST

सांगली - पाच हजार मुलींनी एकत्र येत 'युवती सक्षमीकरण' प्रशिक्षण घेण्याचा विक्रम केला आहे. देशातील हा पहिलाच विक्रम असून या विक्रमाची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली आहे. अखिल भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. ज्यामध्ये मुलींनी सक्षम होण्याचा निर्धारही केला.

5 हजार मुलींनी एकत्रित 'युवती सक्षमीकरणाचे' घेतले प्रशिक्षण

भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून ११ ते २० वयोगटातील मुलींसाठी "स्मार्ट गर्ल" या कार्यशाळेचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे. संपूर्ण भारतामध्ये दरवर्षी हजारो मुलींना निर्भया किंवा उन्नाव सारख्या घटनांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये मुलींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, मनोबल भक्कम करणे, चांगले मित्र-मैत्रिणी ओळखण्याची कला आत्मसात करणे, परिवारालाही मित्र मानणे, टेक्नोलॉजीचा गैरवापर कसा केला जातो हे समजाविणे इत्यादी बाबींचे त्यांना प्रशिक्षण दिले जाते.

हेही वाचा -मुंबई-गोवा महामार्गावर एस टी बस पुलावरुन कोसळली, २० प्रवासी जखमी

सांगली येथे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील ५ हजार मुलींनी हे प्रशिक्षण घेतले असून नेमीनाथ नगरच्या कल्पद्रुम क्रीडांगण येथे या कार्यक्रमांतर्गत ५ हजार मुलींनी युवती सक्षमीकरणाचे एकत्र प्रशिक्षण घेण्याचा विक्रम केला आहे. एकाच वेळी 5 हजार मुलींनी एकत्र येऊन प्रशिक्षण घेण्याच्या या विक्रमाची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड"मध्ये झाली आहे.

हेही वाचा -भातपीक उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार - विश्वजीत कदम

या प्रशिक्षणाआधी आत्मविश्वास कमी होता, मात्र आता प्रशिक्षणानंतर आमच्यामधील आत्मविश्वास वाढला आहे, त्यामुळे अशी प्रशिक्षण प्रत्येक ठिकाणी आणि वारंवार झाली पाहिजेत, असे मत या विक्रमानंतर मुलींनी व्यक्त केले. प्रत्येक मुलगी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम होऊन समाजात एक सक्षम युवती बनून पुढे गेली पाहिजे, या उद्देशाने अखिल भारतीय जैन संघटना सातत्याने हा उपक्रम राबवत असून पुढील काळातही अशाच पद्धतीचे प्रशिक्षण संपूर्ण राज्यभर मुलींना देण्याचा मानस जैन संघटनेकडून व्यक्त करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details