सांगली- जत तालुक्यातील सोनलगी येथे बोर नदी पत्रात बुडून युवकाचा मृत्यू झाला आहे. मनातेश विठ्ठल कांबळे (वय १४) असे युवकाचे नाव असून तो मित्रांसोबत नदीवर पोहायला गेला होता. त्यावेळी ही घटना घडली.
जत तालुक्यातील बोर नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू - youth died bor river
बोर नदी ओढापात्रात सध्या तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी वाहत आहे. आज सकाळी मनातेश कांबळे हा आपल्या दोन मित्रांबरोबर बोर नदी पात्रात पोहायला गेला होता. मात्र, पात्रात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बोर नदी ओढापात्रात सध्या तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी वाहत आहे. आज सकाळी मनातेश कांबळे हा आपल्या दोन मित्रांबरोबर बोर नदी पात्रात पोहायला गेला होता. मात्र, पात्रात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मनातेशचा मृतदेह अद्याप गवसलेला नाही. सांगलीहून पाणबुडी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. उमदी पोलीस, ग्रामस्थ मृतदेहाचा शोध घेत आहेत. परंतु, बोर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मृतदेहाचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत. दरम्यान, मनातेशच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा-जत मधील प्रतापूरमध्ये सिलिंडरचा स्फोट; झोपडी जळून खाक