सांगली - एका आठ वार्षिय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इस्लामपूर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. अरुण जमदाडे असे या आरोपीचे नाव आहे. शिराळा तालुक्यातल्या सोनवडे या ठिकाणी 2 वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
8 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार-
शिराळा तालुक्यातील सोनवडे या ठिकाणी 7 ऑगस्ट 2018 रोजी एका 8 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. गावातील घरासमोर खेळत असताना एका अल्पवयीन मुलाला अरुण जमदाडे या तरुणाने त्याच्या घरा शेजारी असणाऱ्या बोळात ओढून नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. त्यानंतर पीडित मुलाने हा सर्व प्रकार आई-वडीलांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी कोकरूड पोलीस ठाण्यात अरुण जमदाडे याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जमदाडे याला अटक करत त्याचावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा-
या खटल्याची सुनावणी इस्लामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. या प्रकरणी 7 साक्षीदार तपासण्यात आले. तर सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील रणजित पाटील यांनी बाललैंगिक सारख्या घटना वारंवार घडू नयेत. समाजात बाल लैंगिक अत्याचाराला समाजात आळा बसावा, असा जोरदार युक्तिवाद मांडत आरोपी अरुण जमदाडे याला कडक शिक्षा देण्याची मागणी केली. याप्रकरणी न्यायालयाने जमदाडे याला दोषी ठरवत 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी तरुणास 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा - बाल लैंगिक अत्याचार
शिराळा तालुक्यातील सोनवडे या ठिकाणी 7 ऑगस्ट 2018 रोजी एका 8 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली होती.
अरुण जमदाडे, आरोपी