सांगली- जतमध्ये एका खासगी सावकाराच्या मारहाणीमुळे एका तरुणाने गळफास घेवून काल (मंगळवार) रात्री आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात बेकायदा सावकारच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. सावकारीच्या पाशात अडकलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. अशोक केंगार असे तरुणाचे नाव आहे.
जतमध्ये सावकाराच्या त्रासास कंटाळून तरूणाची गळफास घेवून आत्महत्या - आत्महत्या
जतमध्ये एका खासगी सावकाराच्या मारहाणीमुळे एका तरुणाने गळफास घेवून काल (मंगळवार) रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली. अशोक केंगार असे तरुणाचे नाव आहे.
अशोक हा रिक्षा चालवत होता. सावकाराने रिक्षा विकल्याने तो बेरोजगार झाला. त्यामुळे तो जत शहरातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. काल (मंगळवार) राजू कांबळे या सावकाराने तो काम करत असलेल्या हॉटेलमध्ये जावून धिंगाणा घातला. तसेच व्याजाचे पैसे दे म्हणून मारहाण केली. अशोक केंगार याच्याजवळ पैसे नव्हते, त्यामुळे राजू कांबळे व त्यांच्या साथीदाराने केंगार यास बेदम मारहाण केली.
सावकाराच्या मारहाणीला कंटाळून अशोक केंगार याने काल गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अशोकच्या पत्नीने आरती केंगार यांनी जत पोलिसात तक्रार दिली आहे.