सांगली (जत) - भंगार चोरीच्या प्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आलेला संशयित आरोपीने पोलीस ठाण्याच्या आवारात सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुभाष वाघमोडे (रा.उमराणी रोड, जत शहर) असे आरोपीचे नाव आहे.
जत पोलीस ठाण्याच्या आवारात तरुणाचा सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न - Latest news of jath
चोरीचे भंगार विकत घेतल्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या सुभाष वाघमोडे या तरुणाने जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

याबातची अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या कोळेकर वस्तीजवळ बंद पडलेल्या स्टोन क्रशर येथील भंगाराची चोरी झाली होती. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना जत पोलिसांनी अटक केली. या दोन आरोपींनी हे भंगार सुभाष वाघमोडे यांला विकल्याची माहिती दिली होती.
त्या अनुषंगाने जत पोलिसांनी सुभाष वाघमोडे याला नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवले असता त्याने पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवलेले सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. संशयित आरोपीला जत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.