सांगली - भाड्याने कॅमेरे घेऊन विक्री करणाऱ्या एका तरुणाला सांगली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून परस्पर विक्री करण्यात आलेले 21 कॅमेरे हस्तगत करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे.
भाड्याने कॅमेरे घेऊन परस्पर विक्री करणाऱ्या तरुणाला अटक; 21 महागडे फोटो कॅमेरे जप्त हे ही वाचा -मध्य प्रदेश हनीट्रॅप प्रकरण : एका आरोपीची अखेर पोलिसांसमोर कबूली..
सांगली शहरातील फोटोग्राफर आणि इतरांकडून महागडो कॅमेरे भाड्याने घेऊन परस्पर गहाण किंवा विक्री करणाऱ्या एका तरुणास सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. सांगलीच्या लक्ष्मी देऊळ येथे संशयितरित्या कॅमेरा विक्रीसाठी थांबलेल्या ऋत्विक शिंदे या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. शहरातील फोटोग्राफरकडून विश्वास संपादन करत महागडे डीएसएलआर कॅमेरे भाडयाने घेऊन परस्पर घरगुती अडचण असल्याचे सांगून विक्री करत असे. त्याच बरोबर गहाण ठेवून पैसे घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पोलिसांनी शिंदे यांच्या घरावर छापा टाकला असता घरात 21 फोटो कॅमेरे आढळून आले. पोलिसांनी सर्व कॅमेरे जप्त करत ऋत्विक शिंदे याला अटक केली आहे.
हे ही वाचा -त्रिपुरामध्ये १० नराधमांचा रुग्णालयामधून परतणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार