महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरफोडी करणाऱ्या तरुणाला अटक, पावणेसहा लाखांचे दागिने जप्त - Sangli Crime News

घरफोडी करणाऱ्या एका तरुणाला सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. बबलू शिंदे, असे या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून पावणेसहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

घरफोडी करणाऱ्या तरुणाला अटक
घरफोडी करणाऱ्या तरुणाला अटक

By

Published : Mar 6, 2021, 12:30 AM IST

सांगली -घरफोडी करणाऱ्या एका तरुणाला सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. बबलू शिंदे, असे या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून पावणेसहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

आरोपीकडून पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घरफोडींच्या प्रकरणांचा शोध घेत असताना, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला सांगली शहरातील माधवनगर बायपास रस्ता या ठिकाणी सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले. बबलू शिंदे असे या ताब्यात घेण्यात आलेल्या वक्तीचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 5 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने आढळून आले आहेत. पोलिसांनी दागिने जप्त केले असून, आरोपीला अटक केली आहे. दरम्यान 1 वर्षांपूर्वी तासगाव तालुक्यातील सावळज येथे घरफोडी केल्याची कबुली अरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details