सांगली - लॉकडाऊनच्या काळात मिरजेत एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी या पीडितेला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मिरज पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
लॉकडाऊन काळात सांगलीत दारू पाजून तरुणीवर सामूहिक अत्याचार - miraj rape news
लॉकडाऊनच्या काळात मिरजेत एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी या पीडितेला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
अत्याचार झालेली मुलगी मैत्रिणीसोबत घराजवळ बसली होती. तिची मैत्रीण गेल्यानंतर पीडित तरुणी एकटी बसल्याचे पाहून आरोपी अक्षय राजू कनशेट्टी (वय-21) आणि राजू बाबू अचूदन (वय -30) या दोघांनी तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. यानंतर तिला शहरातील गजानन मेडिकलच्या बाजूस असलेल्या निर्जनस्थळी नेण्यात आले. आरोपींनी तरुणीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
याबाबत पीडित तरुणीने महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली असून बलात्कार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.