सांगली - जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक नवीन कोरोना रुग्ण आढळून आला आहे. मुंबईहून आलेल्या वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील एका तरुणाला कोरोना लागण झाली आहे. आज दिवसभरात हा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता १५ वर पोहोचला आहे. चार दिवसांपूर्वी हा ३० वर्षीय युवक मुंबईहून कुंडलवाडी या आपल्या गावी पोहचला होता.
मुंबईवरून आलेल्या तरुणाला कोरोनाची लागण; एकूण रुग्णसंख्या १५वर - SANGALI COVID 19 PATIENT
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक नवा रुग्ण आढळून आला आहे. मुंबईहून आलेल्या वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील एका तरुणाला कोरोना लागण झाली आहे. आज दिवसभरात हा दुसरा रुग्ण आढळून आला आहे.
येलूर या ठिकाणी आरोग्य केंद्रात तपासणी दरम्यान त्याच्यामध्ये कोरोना लक्षण आढळून आली होती. त्यानंतर त्या तरुणाला मिरजेच्या कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. आज त्याला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या तरुणाला मिरजेच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असून, त्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे. तर प्रशासनाकडून त्या बाधित तरुणांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन क्वारंटाईन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. तर शुक्रवारी दिवसभरातील सांगली जिल्ह्यात आढळलेला हा दुसरा कोरोना रुग्ण असून त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे.