महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rolling Supporter for Bull : बैलांच्या मानेवरील ओझे हलके करणारा भन्नाट अविष्कार,अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बनवले 'रोलिंग सपोर्ट'

ऊस वाहतूक करताना बैलांवर असणारे ओझे, आता हलके होणार आहे. त्या बैलांना ( Bull ) ऊस वाहतूक करताना त्यांच्या मदतीसाठी "रोलिंग सपोर्ट" ( Rolling Supporter ) हा अविष्कार निर्माण झाला आहे. इस्लामपूरच्या आर.आय.टी.या अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी हा भन्नाट अविष्कार निर्माण केला आहे. ज्यामुळे बैलांवर पडणारे ओझे आणि अत्याचार कमी होणार ( Bulls trouble will decrease ) आहेत.

Rolling Supporter for Bull
बैलांसाठी "रोलिंग सपोर्ट"

By

Published : Jul 15, 2022, 4:46 PM IST

सांगली -ऊस वाहतूक करताना बैलांवर असणारे ओझे,आता हलके होणार आहे. त्या बैलांना ऊस वाहतूक ( Sugarcane transport ) करताना त्यांच्या मदतीसाठी "रोलिंग सपोर्ट"हा अविष्कार निर्माण झाला आहे. इस्लामपूरच्या आर.आय.टी.या अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी हा भन्नाट अविष्कार निर्माण केला आहे. ज्यामुळे बैलांवर पडणारे ओझे आणि अत्याचार कमी होणार आहेत.

बैलांसाठी "रोलिंग सपोर्ट"

बैलांना होणाऱ्या दुखापतींवर तोडगा -साचा गाळप हंगाम सुरू झाला की, राज्यात ठीक-ठिकाणी रस्त्यावर ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या धावताना पाहायला मिळतात. ऊसाचा प्रचंड डोलारा बैलांची जोडी आपल्या खांद्यावर घेऊन जात असल्याचे चित्र पाहून अनेक वेळा बैलांवर अत्याचारा होत असल्याची चर्चा होते. हजारो किलोच्या उसाची वाहतूक करताना अनेक वेळा बैल खड्ड्यातून जाताना त्यांना गंभीर दुखापत होणे पाय मोडणे अशा घटना वारंवार घडतात. यावर प्राणिमित्रांच्याकडून ही अनेक वेळा बैलांवरील मानवी अत्याचाराबाबत आवाज उठवला जातो. पण त्यांच्यावरील ओझे कमी कसे होईल याबाबत काहीच होत नाही. मात्र बैलांवर होणारे हे अत्याचार आणि ओझे कमी करणारा यशस्वी प्रयोग इस्लामपूरच्या राजारामबापू पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या ( Rajarambapu Patil College of Engineering ) विद्यार्थ्यांनी करून दाखवला आहे.

इस्लामपूरच्या विद्यार्थ्यांचा "सारथी" प्रकल्प -राजरामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड, ओंकार मिरजकर या विद्यार्थ्यांनी बैलांच्या मानेवरील ओझे कमी करण्याच्या दृष्टीने "सारथी"हा प्रकल्प हाती घेतला. त्यातून बैलगाडीमध्ये बैलांना जूंपण्यासाठी असणाऱ्या"जू"च्या बरोबर काही, तर नव्या कल्पनातून बैलांवर पडणारे ओझे कसे कमी होईल, याचा विचार करताना "रोलिंग सपोर्ट"हा पर्याय त्यांच्या समोर आला, यातून या विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने टायर आणि इतर साहित्यांच्या माध्यमातून हा"रोलिंग सपोर्ट"बनवला. त्याचा प्रयोग देखील उसाच्या वाहतुकीसाठी करणाऱ्या एका बैलगाडीमध्ये केला आणि तो यशस्वी देखील झाला.

बैलगाडीमध्ये हे रोलिंग सपोर्ट - बैलगाडीमध्ये ऊस भरण्यात आला. त्यानंतर बैलाच्या मानेवर 'जू' सोबत रोलिंग सपोर्ट ( Rolling Supporter ) जोडण्यात आला. ज्यामुळे बैलांच्या मानेवर असणारे ओझे कमी ( Reduce burden from neck of bull ) होऊन बैलांना बैलगाडी ओढणे सहज शक्य ( Pulling bullock cart is easily ) असल्याचे समोर आले. यामुळे बैलांच्या खांद्यावर व मानेवर असणारे ओझे हलके देखील झाल्याचे समोर आले आहे.

बैलगाडी खेचताना मोठा आधार -बैलगाडी चालकांनी देखील हे "रोलिंग सपोर्ट" बैलांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असल्याचे मत विद्यार्थ्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या रोलिंग सपोर्टमुळे बैलांना आता एक मोठा आधार मिळणार आहे. आणि ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी चालकांनादेखील याचा फायदा होऊन बैलांना होणाऱ्या इजा आणि दुखापत टाळने देखील शक्य होणार आहे. तसेच बैलांवरील ओझे आणि अत्याचार देखील कमी होतील, असे या विद्यार्थ्यांचे मत आहे. आता या रोलिंग सपोर्टच्या पेटंटसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज देखील केला आहे.

हेही वाचा -Devendra Fadnavis meets Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर भेट; शर्मिला ठाकरेंकडून औक्षण

ABOUT THE AUTHOR

...view details