सांगली - येथील एका परप्रांतीय विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास जत शहरातील महाजन गल्लीत घडली. सीमा भरत ढोली (मूळ रा. नेपाळ) असे या मृत महिलेचे नाव आहे.
नेपाळच्या महिलेची सांगलीतील जतमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
गेल्या सहा महिन्यांपूर्वी सीमा आणि भरत यांचा प्रेम विवाह झाला होता. दोन महिन्यांपूर्वी ते जतमध्ये राहण्यास आले होते. भरत शहरातील एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करत आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता हॉटेलमधील काम आटपून घरी आल्यानंतर पत्नी सीमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याला निदर्शनास आले.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी सीमा आणि भरत यांचा प्रेम विवाह झाला होता. दोन महिन्यांपूर्वी ते जतमध्ये राहण्यास आले होते. भरत शहरातील एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करत आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता हॉटेलमधील काम आटपून घरी आल्यानंतर पत्नी सीमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याला निदर्शनास आले. यानंतर भरतने तत्काळ जत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून याची नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -रांजणगावमध्ये कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन, मुंबईत गुन्हा दाखल